इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया : नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

0
49

मुंबई –  शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत नियमित दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना ६ ते ९ जून २०२६ या कालावधीत नवीन नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या पसंतीक्रमात बदल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
प्रवेश प्रक्रियेनुसार १२ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता दुसऱ्या फेरीची प्रवेश वाटप यादी, कट-ऑफ यादी आणि संबंधित माहिती अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना याबाबतची माहिती एसएमएसद्वारेही पाठविण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यंदाच्या प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १२ लाख ५१ हजार २५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून त्यापैकी ४ लाख ५७ हजार ५५२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत.
अकरावी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी निर्धारित मुदतीत अर्जातील आवश्यक बदल करून पसंतीक्रम निश्चित करावेत, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here