ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त वाशी येथे नगराध्यक्षा भावना घाणेकर यांची उपस्थिती
ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त वाशी येथे उरण नगराध्यक्षा भावना घाणेकर यांची उपस्थिती
उरण :
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या पवित्र निमित्ताने वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अल अशियाना फाउंडेशनच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास उरण नगराध्यक्षा भावना घाणेकर उपस्थित राहिल्या.
यावेळी पैगंबर मोहम्मद यांच्या जीवनातील प्रेम, दया, बंधुभाव, मानवता आणि शांततेचा संदेश यांचे स्मरण करण्यात आले. नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी उपस्थित मुस्लिम बांधवांना ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
समाजातील सर्व घटकांमध्ये प्रेम, ऐक्य, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ व्हावा, तसेच समाजात शांतता व सौहार्द नांदावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून सामाजिक एकता आणि परस्पर बंधुभावाचा संदेश देण्यात आला.