उत्कृष्ट बीएलओ म्हणून बाबू घाडीगांवकर यांचा सन्मान

0
19
उत्कृष्ट बीएलओ म्हणून बाबू घाडीगांवकर यांचा सन्मान
उत्कृष्ट बीएलओ म्हणून बाबू घाडीगांवकर यांचा सन्मान

उत्कृष्ट बीएलओ म्हणून बाबू घाडीगांवकर यांचा सन्मान

दापोली | प्रतिनिधी: अरविंद मांडवकर
विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत उत्कृष्ट कामगिरी बजावत २२९-चंद्रनगर मतदान केंद्राचे बीएलओ बाबू घाडीगांवकर यांनी शंभर टक्के मॅपिंग पूर्ण करून संभाव्य सुनावणीची संख्या शून्यावर आणल्याबद्दल त्यांचा उत्कृष्ट बीएलओ म्हणून सन्मान करण्यात आला.
भारतीय स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून दापोलीतील आझाद मैदान येथे आयोजित शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात घाडीगांवकर यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रात सध्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत मतदार यादीचे अचूक मॅपिंग तसेच संभाव्य सुनावणीची प्रकरणे कमी करण्यासाठी बीएलओंकडून महत्त्वपूर्ण काम केले जात आहे. या अंतर्गत दापोली तालुक्यातील २२९-चंद्रनगर मतदान केंद्रावर बाबू घाडीगांवकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.
दापोलीचे उपविभागीय अधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना बोंबे, पंचायत समिती सभापती उन्मेष राजे, नगराध्यक्षा कृपा घाग, जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, गटविकास अधिकारी गणेश मंडलीक, नायब तहसीलदार समीर सावंत, गटशिक्षणाधिकारी रामचंद्र सांगडे आदी मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
शंभर टक्के मॅपिंग आणि संभाव्य सुनावणी संख्या शून्य अशी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बाबू घाडीगांवकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here