उद्धव ठाकरेंनी पाठवलं की, स्वतःच घेतला निर्णय? या प्रश्नाला सिंधुदुर्ग पालक मंत्री उदयजी सामंत यांच स्पष्टी करण

0
30
पुणे डीपी, भिवंडी डम्पिंग ग्राउंड आणि मुंबईतील भोगवटा निर्णयावर मंत्री सामंतांची माहिती
पुणे डीपी, भिवंडी डम्पिंग ग्राउंड आणि मुंबईतील भोगवटा निर्णयावर मंत्री सामंतांची माहिती

प्रतिनिधीसिंधुदुर्ग- अभिमन्यू वेंगुर्लेकर
शिवसेनेला मोठं खिंडार पडलं असून एकापाठोपाठ एक शिवसेना नेते आणि आमदार शिंदे गटात सामील होत आहेत. अशातच काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मंत्री उदय सामंतही गुवाहाटीच्या दिशेनं रवाना झाले आणि राजकीय वर्तुळात विविध चर्चांनी जोर धरला. त्यापैकी एक चर्चा म्हणजे, उदय सामंत यांना खुद्द उद्धव ठाकरेंनीच शिंदे गटात पाठवलं. शिवसेनेच्या एका बैठकीत बोलताना उद्धव ठाकरेंनी हे वृत्त फेटाळलं होतं. पण उदय सामंतांकडून मात्र यावर कोणतीच प्रतिक्रिया समोर आली नव्हती. अशातच आता उदय सामंत यांनी स्वतः समोर येत, शिंदे गटात सामील होण्याचं कारण स्पष्ट केलं आहे. गुवाहाटीला गेल्यानंतर पहिल्यांदाच उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचं जे कारस्थान सहयोगी पक्षांकडून सुरू आहे, त्याला कंटाळून मी गुवाहाटीला आलो, असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं आहे. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षानं एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले आणि अखेर उमेदवार पडला, असं म्हणत उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, पुढे बोलताना याच कारणामुळे आपण शिंदे गटात सामील होण्याची भूमिका घेत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेलं हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. असं असलं तरीही, आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेनं कोणताही गैरसमज करून घेऊ नये.”, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

दरम्यान, उदय सामंतदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. विशेष म्हणजे, शिंदे गटात सामील होण्यापूर्वी उदय सामंत शिवसेनेच्या कार्यकारणी बैठकीत उपस्थित होते. एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेचे 40 आमदार आणि इतर अपक्षांसह जवळपास 50 आमदारांचा गट तयार केला आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार सध्या गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये आहेत. आता या फुटीर आमदारांच्या यादीत उदय सामंत यांचंही नाव जोडलं जाण्याची शक्यता आहे. उदय सामंत हे रत्नागिरीचे आमदार आहेत. कोकणातील दीपक केसरकर यांनीदेखील पक्षाविरोधात बंड पुकारलं आहे. त्याशिवाय, रायगडमधीलही शिवसेनेच्या आमदारांनी एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here