उरणमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा; ‘सम-विषम’ पार्किंगचा प्रस्ताव

0
15
उरणमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा; ‘सम-विषम’ पार्किंगचा प्रस्ताव
उरणमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा; ‘सम-विषम’ पार्किंगचा प्रस्ताव

उरणमध्ये वाहतूक कोंडीवर तोडगा; ‘सम-विषम’ पार्किंगचा प्रस्ताव

उरण : शहरातील मुख्य रस्त्यांवरील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उरण नगराध्यक्षा Bhavana Ghanekar यांनी नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त Tirupati Kakade यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा ‘सम-विषम’ (P2-P1) पार्किंग व्यवस्था लागू करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच संबंधित फलक उभारणी आणि अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन व स्पष्ट आदेश देण्याची विनंती करण्यात आली.

उरण शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे निर्माण होणारी कोंडी लक्षात घेता या उपाययोजनेमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

उरणकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर व्हावा, हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचे भावना घाणेकर यांनी यावेळी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here