एअर प्युरिफायरवरील जीएसटी कमी करण्याबाबत जीएसटी परिषदेला दिल्ली उच्च न्यायालयाचे निर्देश

0
120

नवी दिल्ली l

दिल्लीसह देशभर वाढत चाललेल्या हवेच्या प्रदूषणाच्या गंभीर समस्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली उच्च न्यायालयाने जीएसटी परिषदेला तातडीने बैठक घेण्याचे निर्देश दिले आहेत. एअर प्युरिफायरसारख्या आरोग्याशी संबंधित आवश्यक उपकरणांवरील जीएसटी दर कमी करण्याबाबत विचार करण्यास न्यायालयाने सांगितले आहे.

न्यायालयाने निरीक्षण नोंदवताना म्हटले की, एअर प्युरिफायरवर ५ टक्के जीएसटी का आकारला जाऊ नये, याचे कोणतेही ठोस कारण प्रथमदर्शनी दिसून येत नाही. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असताना अशा उपकरणांवर जास्त कर आकारणे योग्य ठरत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ डिसेंबर २०२६ रोजी होणार असून, तोपर्यंत जीएसटी परिषद यासंदर्भात कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here