एक्झिम बँकेत १२० पदांसाठी भरती; मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजर होण्याची संधी
मुंबई :
भारत सरकारच्या मालकीच्या एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडिया (एक्झिम बँक) मार्फत मॅनेजमेंट ट्रेनी आणि मॅनेजर (MM-II) पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण १२० पदे भरली जाणार असून, पदवीधर आणि व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
पदनिहाय रिक्त जागा :
-
मॅनेजमेंट ट्रेनी : ९० पदे
-
मॅनेजर (MM-II) : ३० पदे
-
एकूण : १२० पदे
शैक्षणिक पात्रता : पदानुसार संबंधित शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक पात्रता आवश्यक आहे. यामध्ये MBA, PGDBA, PGDBM, MMS, CA, CMA तसेच कायदा, तंत्रज्ञान, वित्त, बँकिंग आणि इतर संबंधित विषयांतील पात्रतांचा समावेश आहे. काही पदांसाठी कामाचा अनुभवही आवश्यक आहे.
वयोमर्यादा (१ नोव्हेंबर २०२६ रोजी) :
-
मॅनेजमेंट ट्रेनी : २१ ते २८ वर्षे.
-
मॅनेजर (MM-II) : २४ ते ३० वर्षे.
- आरक्षित प्रवर्गांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
अर्ज प्रक्रियेचा तपशील :
-
ऑनलाइन अर्ज सुरू : २७ नोव्हेंबर २०२६
-
अर्ज करण्याची अंतिम तारीख : ११ डिसेंबर २०२६
-
परीक्षा : डिसेंबर २०२६ (संभाव्य)
-
अर्ज पद्धती : ऑनलाइन
- निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि वैयक्तिक मुलाखत.


