एमएसआरटीसी एनसीएमसी कार्ड प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक अडचणी

0
17
एमएसआरटीसी एनसीएमसी कार्ड प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक अडचणी
एमएसआरटीसी एनसीएमसी कार्ड प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक अडचणी

एमएसआरटीसी एनसीएमसी कार्ड प्रक्रियेत ज्येष्ठ नागरिकांसमोर अनेक अडचणी

विश्वनाथ पंडित, ठाणे 

एमएसआरटीसीकडून सवलतधारी प्रवाशांसाठी एनसीएमसी कार्ड सुरू करण्याचा उपक्रम स्वागतार्ह आहे. मात्र, या प्रक्रियेत अनेक ज्येष्ठ व अमृत ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कार्ड नोंदणीसाठी आवश्यक असलेले बोटांचे ठसे (फिंगरप्रिंट) मशीनद्वारे घेतले जातात. परंतु वयोमानामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांचे अंगठ्याचे व बोटांचे ठसे स्पष्टपणे उमटत नाहीत. परिणामी, मशीन त्यांचे ठसे स्वीकारत नाहीत. त्यामुळे अशा नागरिकांना कार्ड मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत.

समस्येबाबत स्पष्ट मार्गदर्शन कोणत्याही स्तरावर उपलब्ध नाही. कार्ड नोंदणी केंद्र, एसटी डेपो किंवा खासगी केंद्र चालकांकडूनही उत्तरे, मार्गदर्शन मिळत नाहीत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची अनावश्यक धावपळ होत असून त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशांना कार्ड मिळणारच नाही काय असाही प्रश्न उभा राहतो. बोटांचे ठसे न जुळणाऱ्या ज्येष्ठांसाठी पर्यायी ओळख पडताळणीची व्यवस्था होणे अत्यंत आवश्यक असून सर्व कार्ड केंद्रांना स्पष्ट सूचना व मार्गदर्शक तत्त्वे द्यावीत. या उपाययोजनांमुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळेल आणि शासनाच्या या उपक्रमाचा लाभ सर्वांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here