एसएससी सीजीएल २०२६ : १२,२५६ पदांसाठी मेगा भरती; पदवीधरांसाठी सुवर्णसंधी
नवी दिल्ली :
कर्मचारी निवड आयोगाने (SSC) केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग, वैधानिक संस्था, घटनात्मक संस्था आणि न्यायाधिकरणांमधील गट ‘ब’ आणि गट ‘क’ पदांच्या भरतीसाठी एसएससी सीजीएल (Combined Graduate Level) परीक्षा २०२६ ची अधिसूचना जाहीर केली आहे. यंदा अंदाजे १२,२५६ रिक्त पदे भरण्यात येणार असून पदवीधर उमेदवारांसाठी ही मोठी रोजगार संधी मानली जात आहे.
एसएससी सीजीएल ही केंद्र सरकारमधील विविध प्रतिष्ठित पदांसाठी घेतली जाणारी देशातील सर्वात महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षांपैकी एक आहे. सहाय्यक विभाग अधिकारी, आयकर निरीक्षक, केंद्रीय उत्पादन शुल्क निरीक्षक, लेखापरीक्षक, लेखापाल, सांख्यिकी अन्वेषक आदी विविध पदांसाठी या परीक्षेद्वारे भरती केली जाते.
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २१ मे २०२६ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जून २०२६ (रात्री ११ वाजेपर्यंत) आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावेत.
तपशीलवार पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रम आणि आरक्षणासंदर्भातील माहिती अधिकृत अधिसूचनेत उपलब्ध आहे.
महत्त्वाची माहिती
-
परीक्षा : SSC CGL 2026
-
एकूण रिक्त पदे : 12,256
-
पदांचा प्रकार : गट ‘ब’ आणि गट ‘क’
-
अर्ज सुरू : 21 मे 2026
-
अर्जाची अंतिम तारीख : 22 जून 2026
-
अधिकृत संकेतस्थळ : SSC


