ओंकार हत्तीचे सध्या उगवे-कासुले परिसरात बस्तान

0
184
हत्ती व वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात सिंधुदुर्गात शेतकऱ्यांचा रास्ता रोकोचा इशारा
हत्ती व वन्यप्राण्यांच्या उपद्रवाविरोधात सिंधुदुर्गात शेतकऱ्यांचा रास्ता रोकोचा इशारा

ओंकार हत्तीचे सध्या उगवे-कासुले परिसरात बस्तान

मोरजीम:

ओंकार हत्तीने सध्या उगवे-कासुले परिसरात आपले बस्तान मांडले असून कवाथे, केळी यांची नासधूस करत असतानाच लोकवस्तीत येऊन लाल व पांढऱ्या रंगाच्या वाहनांवर लक्ष केंद्रित केले आहे.

या वाहनांची मोडतोड करायला सुरवात केल्यामुळे स्थानिक भयभीत झाले आहेत. रात्री ९-१० वा.नंतर ओमकार हत्ती लोकवस्तीत प्रवेश करून स्थानिकांची झोपमोड करत आहे. तो हत्ती जातो कुठे, काय करतो, याच्यावर फक्त वन खात्याचे कर्मचारी पाळत ठेवण्याशिवाय दुसरे काहीच करू शकत नाहीत.

यामुळे त्रस्त झालेल्या उगवेवासीयांनी सरकारला इशारा देताना सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये. कायदा हातात घेतला तर स्थानिकांना दोष देऊ नका. त्याअगोदर या ओंकार हत्तीचा बंदोबस्त करा, अशी मागणी केलेली आहे. ओंकार हत्तीने उगवे परिसरात कवाथे-केळी खाण्याबरोबरच तीन-चार चारचाकी वाहनांचे नुकसान केले होते. गुरुवारी रात्री कासुले-उगवे परिसरात एका चारचाकी वाहनाचे नुकसान केले.

आज इकडे, उद्या तिकडे

एक दिवस निगळे-पोरस्कडे परिसरात ओंकार हत्ती येतो. त्यानंतर लगेच कासुले मार्गे उगवे परिसरात येऊन नुकसानी करत आहे. त्यामुळे आणखी विलंब न लावता सरकारने या ओंकार हत्तीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी सरपंच सुबोध महाले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here