ओरोस जिल्हा उद्योग केंद्राचा निरीक्षक रंगेहाथ लाचलुचपत करताना अटक

0
164
ओरोस जिल्हा उद्योग केंद्राचा निरीक्षक रंगेहाथ लाचलुचपत करताना अटक
ओरोस जिल्हा उद्योग केंद्राचा निरीक्षक रंगेहाथ लाचलुचपत करताना अटक

ओरोस जिल्हा उद्योग केंद्राचा निरीक्षक रंगेहाथ लाचलुचपत करताना अटक

ओरोस l प्रतिनिधी

ओरोस जिल्हा उद्योग केंद्राचा निरीक्षक पंकज शेळके (वय ३१, सध्या रा. ओरोस, मूळ रा. पलूस, जि. सांगली) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्गच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर कर्ज अनुदान मंजूर करण्यासाठी २२ हजार रुपयांची लाच घेण्याचा आरोप आहे.

घटनेनुसार, जिल्ह्यातील एका व्यक्तीला महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत नवीन आयशर खरेदीसाठी २६ लाख रुपये कर्ज मंजूर झाले होते. यातील ३५ टक्के अनुदान शासनाकडून दिले जाणार होते. कर्ज मंजुरीसाठी संबंधित लाभार्थ्याने सिंधुदुर्ग येथील जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रस्ताव सादर केला होता.

दरम्यान, कर्ज मंजुरीसाठी पंकज शेळके यांनी मंजूर कर्ज रकमेच्या एक टक्क्याप्रमाणे २६ हजार रुपयांची लाच मागितली होती. या मागणीची तक्रार लाभार्थ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली होती. त्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांच्या पेट्रोल पंपाजवळ निरीक्षक पंकज शेळके याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग करत असून, आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here