कन्नडमध्ये शिवसेनेची विराट जनसभा; उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन

0
134
कन्नडमध्ये शिवसेनेची विराट जनसभा; उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन
कन्नडमध्ये शिवसेनेची विराट जनसभा; उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन

कन्नडमध्ये शिवसेनेची विराट जनसभा; उमेदवारांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षातर्फे आयोजित विराट जनसभेत शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिता कवडे यांच्यासह सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले.

सभेत बोलताना वक्त्यांनी कन्नड हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचे सांगितले. “इथे आमदार संजना जाधव या माझी लाडकी बहिण आहे आणि आता अनिता कवडे यांच्या रूपाने आणखी एक बहिण तुमच्या सेवेत दाखल होत आहे. विधानसभा निवडणुकीत जसा करिष्मा घडवून दाखवला, तसा यंदा नगरपरिषद निवडणुकीतही करून दाखवा”, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

राज्यात महिलांना सक्षम करण्यासाठी राबविलेल्या लाडकी बहिण योजना, लेक लाडकी लखपती योजना, मुलींसाठी मोफत उच्च शिक्षण, एसटी प्रवासात ५० टक्के सवलत या महत्त्वाच्या निर्णयांचा उल्लेख करून “महिलांसाठी केवळ १,५०० रुपयांवर थांबणार नसून नगरविकास विभागामार्फत खेळते भांडवल उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे” असेही नमूद करण्यात आले.

कन्नडमध्ये उत्तम रस्ते, दर्जेदार आरोग्य सुविधा, शाश्वत पाणीपुरवठा, क्रीडांगणे, मैदाने, अभ्यासिका आदी आवश्यक सुविधांसाठी शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने पाठिंबा देण्याचे आवाहनही करण्यात आले. नगरविकास विभागाच्या माध्यमातून आवश्यक निधी मिळवून विकासकामांना गती देऊ, असे आश्वासन सभेत देण्यात आले.

कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री व छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार संजना जाधव, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अनिता कवडे, स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here