कलमठमध्ये १० नोव्हेंबरला दिवाळी फराळ स्पर्धा; विजेत्यांना आकर्षक रोख बक्षिसे
कलमठमध्ये १० नोव्हेंबरला दिवाळी फराळ स्पर्धा
कणकवली :
दीपावलीनिमित्त ठाकरे शिवसेनेच्या कलमठ विभागातर्फे कलमठ मर्यादित मंगळवार १० नोव्हेंबरला सायंकाळी ५ वा. येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात दिवाळी फराळ स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेकरिता अनुक्रमे १ हजार ५०१ रु, १ हजार १ रु., ७०१ रु. उत्तेजनार्थ ५०१ रु. आणि भेटवस्तू अशी बक्षिसे आहेत. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल.
स्पर्धकांनी स्वत: तयार केलेला दिवाळी फराळाचा पारंपरिक पदार्थ घेऊन यायचा आहे. तरी जास्तीत महिलांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेनेचे कलमठ शहरप्रमुख धीरज मेस्त्री यांनी केले आहे.
स्पर्धच्या अधिक माहितीसाठी वैदेही गुडेकर, छाया हजारे, स्वरा गावडे, अर्चना धुमाळे, पूजा बेलवलकर, अनुष्का कांबळी यांच्याकडे संपर्क साधावा. महिलांच्या कलागुणांना वाव देणे व दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित करणे हा स्पर्धेचा उद्देश आहे.