कल्याण पश्चिममध्ये १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’
कल्याण पश्चिममध्ये १६ ते १८ ऑक्टोबरदरम्यान ‘कोकणी बाजारपेठ’
मराठी व कोकणी उद्योजकांच्या उत्पादनांना मिळणार हक्काची बाजारपेठ
नागरिकांना एकाच छताखाली विविध वस्तूंची खरेदी करण्याची संधी
कल्याण :
मराठी व कोकणी उद्योजकांना व्यवसायासाठी व्यासपीठ आणि त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या ‘मिशन कोकण साम्राज्य’च्या वतीने कल्याण पश्चिम येथे १६, १७ आणि १८ ऑक्टोबर २०२६ रोजी तीन दिवसीय ‘कोकणी बाजारपेठ’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात कोकणातील तसेच स्थानिक उद्योजकांची विविध उत्पादने एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. घरगुती खाद्यपदार्थ, दागिने, साड्या, कपडे, हस्तकला वस्तू, भेटवस्तूंसाठीचे साहित्य आणि नैसर्गिक उत्पादनांसह विविध वस्तूंची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.
‘मिशन कोकण साम्राज्य’च्या माध्यमातून मराठी व कोकणी उद्योजकांना प्रोत्साहन देणे, नवोदित उद्योजकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या उत्पादनांना ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी बाजारपेठ निर्माण करणे, हा सातत्यपूर्ण प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमामुळे स्थानिक उद्योजकांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
ही कोकणी बाजारपेठ नक्षत्र बँक्वेट हॉल, गेट क्रमांक ४, गोदरेजजवळ, स्पोर्ट्स क्लब ग्राउंड, कल्याण पश्चिम येथे भरविण्यात येणार आहे. बाजारपेठेची वेळ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत असेल.
नागरिकांनी कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह या बाजारपेठेला आवर्जून भेट देऊन कोकणी व मराठी उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आयोजक श्री. अजय आत्माराम यादव यांनी केले आहे.