कल्याण स्थानकावरील फास्ट मार्गावरील रुळ तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत 

0
30

ठाणे, दि. २६ : कल्याण रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ५ ला जोडणाऱ्या फास्ट मार्गावरील रुळाला तडा (रेल फ्रॅक्चर) गेल्यामुळे आज सकाळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. या बिघाडामुळे अनेक लोकल गाड्या विलंबाने धावत असून, कार्यालयीन वेळेत प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
रेल्वे प्रशासनाने तांत्रिक बिघाडाची माहिती मिळताच दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र, सकाळच्या गर्दीच्या वेळेत या घटनेचा परिणाम लोकल सेवांवर झाला असून, अनेक गाड्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत.
दरम्यान, कल्याण स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वरून ये-जा करणाऱ्या रेल्वे वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून, त्या मार्गावरील रेल्वे सेवा सुरळीत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत सूचना तपासण्याचे आवाहन केले असून, तांत्रिक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here