कसाल एनएच-६६ वर वाहतूक मार्गात तात्पुरता बदल; नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

0
33
कसाल एनएच-६६ वर वाहतूक मार्गात तात्पुरता बदल; नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन
कसाल एनएच-६६ वर वाहतूक मार्गात तात्पुरता बदल; नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

कसाल एनएच-६६ वर वाहतूक मार्गात तात्पुरता बदल; नागरिकांना पर्यायी मार्ग वापरण्याचे आवाहन

कणकवली : कसाल येथील मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील आरयूबी परिसरात हाईट गेजचे दोन कॉलम व टॉप बीम बदलण्याचे काम गुरुवार, २३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १.०० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महामार्गावरील वाहतुकीत तात्पुरता बदल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

या कामकाजादरम्यान मुंबई–गोवा लेनवरील वाहतूक गोवा–मुंबई या एकाच लेनवरून म्हणजे कसाल–बेळणे ब्रिजमार्गे गोवाच्या दिशेने एकमार्गी वळविण्यात येणार आहे. तसेच गोवा–मुंबई लेनवरील वाहतूक हॉटेल साई माऊली, कसाल, कुंदे फाटा या दुतर्फा मार्गावरून वळविण्यात येणार आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी उपविभागीय अभियंता, मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६, सावंतवाडी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस मदत केंद्र कणकवली, कसाल पोलीस निरीक्षक व जिल्हा वाहतूक शाखा यांना समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १६६ नुसार बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी मार्ग नागरिकांच्या निदर्शनास आणण्यासाठी दिशादर्शक फलक व वाहतूक संकेत चिन्हे लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, संबंधित कालावधीत वाहतूक कोंडी अथवा अपघात होऊ नयेत यासाठी वाहतूक पोलीस व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घेऊन वाहतुकीचे नियमन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांनी या कालावधीत प्रशासनाने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here