कसाल जिल्हापरिषद विभागातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

0
91
कसाल जिल्हापरिषद विभागातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर
कसाल जिल्हापरिषद विभागातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

कसाल जिल्हापरिषद विभागातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

सिधुदुर्गनगरी
कसाल जिल्हापरिषद विभागातील विविध पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या कसाल जि. प. विभागप्रमुख पदी रविंद्र कदम यांची नेमणूक करत. माजी आ. वैभव नाईक, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी केले त्याचे अभिनंदन केले आहे
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कसाल जिल्हापरिषद विभागाची बैठक माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या बैठकीत जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. तसेच पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. त्यामध्ये कसाल जि. प. विभागप्रमुखपदी रविंद्र (रवीबुवा) कदम, उपतालुका संघटकपदी सुनील बोंद्रे, उपविभाग प्रमुखपदी निलेश परब, युवासेना विभागप्रमुखपदी रविंद्र परब, युवासेना उपविभागप्रमुखपदी मनीष पारकर,ओरोस उपशहरप्रमुखपदी प्रशांत परब,ओरोस शाखाप्रमुखपदी रोहन सावंत यांची नेमणूक करण्यात आली आहे. माजी आमदार वैभव नाईक व उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here