कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या स्वच्छतेसाठी नवी मुंबई महापालिकेचे विशेष पथक दाखल

0
8

२५ स्वच्छतादूतांचा समावेश; १९ ते २१ नोव्हेंबरदरम्यान स्वच्छता मोहीम राबविणार

नवी मुंबई :
कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असल्याने भाविकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचे २५ स्वच्छतादूतांचे विशेष पथक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी पंढरपूर येथे रवाना करण्यात आले.

महापौर सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, तसेच अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) डॉ. अजय गडदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पथक कार्यरत राहणार आहे.
प्रमुख स्वच्छता निरीक्षक लवेश पाटील, नवनाथ ठोंबरे आणि विजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली या पथकात २५ स्वच्छतादूतांचा समावेश आहे. १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत पंढरपूर येथे स्वच्छतेची जबाबदारी हे पथक पार पाडणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दरवर्षी कार्तिकी एकादशीनिमित्त भाविकांच्या सेवेसाठी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. यंदाही शहराच्या सीमांपलीकडे जाऊन स्वच्छतेचा संदेश आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम महापालिकेने सुरू ठेवला आहे.
पंढरपूर येथे स्वच्छतेची सेवा बजावणाऱ्या सर्व स्वच्छतादूतांचे महानगरपालिकेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here