कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात ५ कोटींचा निधी; एकनाथ शिंदे यांच्याकडून सुविधांची पाहणी 

0
9
कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात ५ कोटींचा निधी; एकनाथ शिंदे यांच्याकडून सुविधांची पाहणी 
कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात ५ कोटींचा निधी; एकनाथ शिंदे यांच्याकडून सुविधांची पाहणी 

कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात ५ कोटींचा निधी; एकनाथ शिंदे यांच्याकडून सुविधांची पाहणी 

पंढरपूर :
कार्तिकी एकादशी यात्रेसाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार आणि पंढरपूर नगरपालिकेच्या माध्यमातून व्यापक नियोजन करण्यात आले आहे. यात्रेच्या व्यवस्थापनासाठी नगरपालिकेला पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, स्वच्छता, आरोग्य, पिण्याचे पाणी, रस्ते आणि निवास व्यवस्थेसाठी आवश्यक मनुष्यबळ व आधुनिक यंत्रणा तैनात करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

 

कार्तिकी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर येथे मोटारसायकलवरून शहरातील विविध व्यवस्थांची पाहणी केली. त्यानंतर चंद्रभागा नदीच्या पात्रात बोटीतून फेरफटका मारत वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. पाहणीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यात्रेसाठी मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाला सर्वंकष नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रस्त्यांची दुरुस्ती, परिसराची स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची उपलब्धता यांना प्राधान्य देण्यात आले आहे. वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
यात्रा काळात आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवण्यात आली असून, विविध ठिकाणी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचीही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पाहणी केली.
भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त स्वच्छता कर्मचारी, यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. सार्वजनिक शौचालये आणि स्नानगृहांची दिवसातून चार ते पाच वेळा स्वच्छता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चंद्रभागा नदीच्या पात्रात उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहांची शिंदे यांनी स्वतः पाहणी केली. स्वच्छतागृहांमध्ये स्वच्छता आणि पुरेशा पाण्याची व्यवस्था असल्याची खात्री करून त्यांनी समाधान व्यक्त केले.
दरम्यान, चंद्रभागेच्या तीरावरील पायऱ्यांची पाईपद्वारे पाणी मारून स्वच्छता सुरू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः पाईप हातात घेऊन पायऱ्यांची स्वच्छता केली. त्यानंतर बोटीतून नदीपात्रात फेरफटका मारून दोन्ही तीरांवर वारकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या विविध सुविधांची पाहणी केली.
यात्रा काळात भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here