काशीद समुद्रकिनारी बुडणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी दिले जीवदान
काशीद समुद्रकिनारी बुडणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी दिले जीवदान
रायगड:
रायगड पोलीस दलातील दोन पोलीस अंमलदारांनी कर्तव्यदक्षता, तत्परता आणि धाडसाचे दर्शन घडवत काशीद समुद्रकिनारी बुडण्याच्या स्थितीत असलेल्या पती-पत्नीचे प्राण वाचवले.
काशीद समुद्रकिनारी समुद्राच्या तीव्र प्रवाहात अडकून वाहून जाण्याच्या स्थितीत असलेल्या दाम्पत्याला या दोन्ही पोलीस अंमलदारांनी प्रसंगावधान राखत आणि कौशल्याने सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी आणि कौतुकास्पद कामगिरीमुळे दोन जीव वाचले.
या उल्लेखनीय कार्याची दखल घेत रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक श्रीमती ऑंचल दलाल यांनी संबंधित दोन्ही पोलीस अंमलदारांचा प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरव केला.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस दल नेहमीच तत्पर असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. समुद्रकिनाऱ्यांवर फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांनी देखील सुरक्षा सूचनांचे पालन करावे आणि धोकादायक भागात जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.