किल्ले रायगडाच्या पायथ्याशी धार पवार सरदारांचे भव्य स्मारक उभारणार

0
15
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी धार पवार सरदारांचे भव्य स्मारक उभारणार
किल्ले रायगडाच्या पायथ्याशी धार पवार सरदारांचे भव्य स्मारक उभारणार

किल्ले रायगडाच्या पायथ्याशी धार पवार सरदारांचे भव्य स्मारक उभारणार

गड कालिका माता मंदिराचे भूमिपूजन संपन्न

रायगड :
श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठान, महाराष्ट्र यांच्या वतीने किल्ले रायगडाच्या पायथ्याशी खरकवाडी, वाकी बुद्रुक येथे धार पवार सरदारांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. या स्मारकासाठी जमीन देणगी हस्तांतरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कुलस्वामिनी गड कालिका माता मंदिराचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्याला उपस्थित राहून पवार घराण्याचे कुलदैवत असलेल्या गड कालिका मातेचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी उपस्थित समाजबांधवांना शुभेच्छा देण्यात आल्या. धार पवार भावकी आणि प्रतिष्ठानच्या वतीने याप्रसंगी विशेष सन्मान करण्यात आला. समाजबांधवांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल आणि आपुलकीच्या सन्मानाबद्दल उपस्थितांचे आभार व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला महाडचे तहसीलदार महेश शितोळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सागर पवार, प्रतिष्ठानचे सर्व विश्वस्त, समन्वयक व पदाधिकारी तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेले धार पवार घराण्याचे बंधू-भगिनी आणि खरकवाडी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here