कुडाळ पंचायत समितीची सात वर्षांनंतर आमसभा.
कुडाळ पंचायत समितीची तब्बल सात वर्षांनंतर प्रथम आमसभा २७ एप्रिलला सकाळी ११.०० वाजता महालक्ष्मी हॉल येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
२०१९ च्या मार्चनंतर ही पहिलीच आमसभा असून, २०२५-२६ च्या वित्तीय वर्षातील कामकाजाचा आढावा घेतला जाईल.
आमसभेत निवेदने द्यायची असल्यास २६ एप्रिल दुपारपर्यंत पंचायत समितीत सादर करावीत, असे सभापती मिलिंद नाईक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या पार्श्वभूमीवर सभापती नाईक यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, सदस्य निखिल कांदळगावकर, काका कुडाळकर, उमेदचे गणेश राठोड उपस्थित होते. नाईक म्हणाले, आमदार राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिली आमसभा आहे. दरम्यानच्या काळात प्रशासकीय यंत्रणा कार्यरत होती. गावातील विकासकाम किंवा इतर मुद्द्यांवर निवेदने स्वीकारली जातील.


