कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ : ६ ऑगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार
कृषी पदवी प्रवेश प्रक्रिया २०२६-२७ : ६ ऑगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार
मुंबई :
महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने (CET Cell) शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी कृषी व संलग्न पदवी अभ्यासक्रमांच्या (Agriculture UG) केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेचे (CAP) महत्त्वाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.३० नंतर तात्पुरती गुणवत्ता यादी (Provisional Merit List) प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना ७ ते ९ ऑगस्ट २०२६ या कालावधीत हरकती व तक्रारी नोंदविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानंतर १२ ऑगस्ट २०२६ रोजी अंतिम गुणवत्ता यादी (Final Merit List) प्रसिद्ध केली जाईल.
तसेच १३ व १४ ऑगस्ट २०२६ रोजी CAP राऊंड-१ साठी पर्याय अर्ज (Option Form) भरण्याची प्रक्रिया पार पडणार आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ७ सप्टेंबर २०२६ पासून शैक्षणिक वर्गांना सुरुवात होणार आहे.
कृषी, उद्यानविद्या, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, अन्न तंत्रज्ञान आणि अन्य संलग्न पदवी अभ्यासक्रमांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन CET सेलने केले आहे.
महत्त्वाच्या तारखा :
तात्पुरती गुणवत्ता यादी : ६ ऑगस्ट २०२६ (सायं. ५.३० नंतर)