कृषी विभागाचे फार्मर आयडी नोंदणीसाठी २० मे अंतिम मुदत

0
11
कृषी विभागाचे फार्मर आयडी नोंदणीसाठी २० मे अंतिम मुदत
कृषी विभागाचे फार्मर आयडी नोंदणीसाठी २० मे अंतिम मुदत

कृषी विभागाचे फार्मर आयडी नोंदणीसाठी २० मे अंतिम मुदत

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) अनिवार्य करण्यात आला असून, अद्याप नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांनी २० मे २०२६ पूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन Agriculture Department Maharashtra मार्फत करण्यात आले आहे.

राज्यात AgriStack योजनेची अंमलबजावणी सुरू असून शेतकऱ्यांची माहिती एकत्रित करून त्यांना योजनांचा थेट लाभ देण्याचा उद्देश आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, राज्यात एकूण १.७१ कोटी खातेदार आहेत. यापैकी १.३२ कोटी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी नोंदणी पूर्ण केली आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही.

फार्मर आयडी नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या सेवा सुविधा केंद्राला भेट द्यावी किंवा ऑनलाइन पद्धतीने ॲग्रीस्टॅक पोर्टलवरूनही नोंदणी करता येणार आहे.

कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, भविष्यातील बहुतेक शासकीय कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक राहणार असल्याने सर्व शेतकऱ्यांनी वेळेत नोंदणी करून घ्यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here