कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची भेट

0
16
कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची भेट
कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची भेट

कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कुलगुरू डॉ. संजय भावे यांची भेट

कामकाजाबाबत व्यक्त केले समाधान

कृषी संशोधन केंद्र, पालघर येथे दि. १७ जून २०२६ रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी भेट देऊन केंद्राच्या विविध संशोधन व विकास कामांचा आढावा घेतला.

यावेळी त्यांनी केंद्रातील शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांशी संवाद साधत मार्गदर्शनपर भाषण केले. प्रक्षेत्र भेटीदरम्यान केंद्रामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे निरीक्षण करून त्यांनी कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यातही याच जिद्दीने आणि गुणवत्तेने संशोधन कार्य सुरू ठेवण्याचे आवाहन केले.
या भेटीदरम्यान केंद्रातील सुधारित हवामान वेधशाळेचे उद्घाटनही कुलगुरू डॉ. भावे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. दहिफळे, शास्त्रज्ञ डॉ. सय्यद, डॉ. ढाणे, डॉ. गभाळे, डॉ. कदम, कृषी सहाय्यक शनवार, मुणगेकर, श्रीमती गुंजाळ, अश्विनी संखे, लिपिक श्रीमती निकिता संखे, पाटील तसेच OFR योजनेचे कृषी सहाय्यक विकास पाटील आणि इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here