केळी, नारळ व सुपारी उत्पादक शेतकऱ्यांना पीक विमा अर्जासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

0
8

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना लाभ; जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांचे आवाहन

सिंधुदुर्ग :
जिल्ह्यातील केळी, नारळ आणि सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना (RWBCIS) अंतर्गत विमा अर्ज सादर करण्यास तसेच विमा हप्ता भरण्यास १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या निर्णयामुळे अद्याप पीक विमा नोंदणी न केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.
राष्ट्रीय पीक विमा पोर्टल (NCIP) उशिराने कार्यान्वित झाल्यामुळे रब्बी हंगाम २०२६-२७ च्या सुरुवातीला शेतकऱ्यांची नोंदणी अपेक्षेप्रमाणे होऊ शकली नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने अर्ज आणि विमा हप्ता भरण्याची मुदत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
या मुदतवाढीचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केळी, नारळ आणि सुपारी उत्पादक कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना घेता येणार आहे. या योजनेची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा नोंदणी केली नसल्यास या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. १५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावर किंवा अधिकृत पीक विमा पोर्टलवर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here