कै. रघुनाथ कदम स्मृती एकांकिका महोत्सव

0
61
कै. रघुनाथ कदम स्मृती एकांकिका महोत्सव
कै. रघुनाथ कदम स्मृती एकांकिका महोत्सव

कै. रघुनाथ कदम स्मृती एकांकिका महोत्सव

देवगड l प्रतिनिधी

देवगड तालुक्यातील शिरगाव येथील प्रसिद्ध नाट्य संस्था ‘मित्र शिरगाव’ यांचा 26 वा नाट्य महोत्सव रविवार दिनांक 1फेब्रुवारी 2026 रोजी होतो आहे. देवगड तालुक्यातील वळीवंडे गावचे सुपुत्र जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक कै.श्री रघुनाथ कदम सर यांच्या स्मृतीस हा महोत्सव अर्पण आहे. यंदा एक दिवसीय नाट्य महोत्सव असून नाट्य रसिकांसाठी चार एकांकिकांचा संच सादर होणार आहे.

यात सादर होणाऱ्या एकांकिका खालील प्रमाणे –

1. विद्या मंदिर हायस्कूल कणकवली निर्मित- पडीक ( बाल एकांकिका )

2. एस एम हायस्कूल प्राथमिक विभाग कणकवली प्रस्तुत – पांडुरंग नागू आणि सावतोबाचा ( बाल एकांकिका )

3. शिरगाव हायस्कूल आणि मित्र शिरगाव निर्मित- थोर तुझे उपकार ( बाल एकांकिका )

4. मित्र शिरगाव निर्मित- आईतवार ( खुला गट )

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक होतकरू बालकलाकारांना, शाळा व नाट्य संस्थांना प्रोत्साहन पाठिंबा व आशीर्वाद देण्यासाठी व कै. श्री रघुनाथ कदम सर यांना आदरांजली वाहण्यासाठी सर्व नाट्य रसिकांना नम्र विनंती आहे. की त्यांनी नाट्य महोत्सवाला आवर्जून उपस्थित राहावे आणि या नाटकांचा आस्वाद घ्यावा. तसेच यामुळे कलाकारांनाही प्रोत्साहन मिळेल .कलाकारांना आपल्या कलागुणांना वाव मिळाल्याचे समाधान आणि आनंद लाभेल .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here