कोकण : निवळी- जयगड रस्त्याचे चौपदरीकरण होणार : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

0
100
जयगड रस्त्याचे चौपदरीकरण होणार : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली- कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरास जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड या रस्त्याचे चौपदरीकरण लवकरच होणार असल्याची माहिती केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
राज्याच्या आणि कोकणच्या विविध विकासात्मक विषयांसंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नुकतीच दिल्ली येथे केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी रत्नागिरीतील निवळी – जयगड रस्त्याच्या कामाची पूर्तता लवकरच होणार असल्याचे वचन श्री.गडकरी यांनी उदय सामंत यांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here