कोकण रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यांसाठी आमदार प्रमोद जठारांची COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा
कोकण रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांच्या थांब्यांसाठी आमदार प्रमोद जठारांची COM यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा
कोकण :
राजापूर, विलवडे, संगमेश्वर आणि वैभववाडी रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा, तसेच प्रवाशांच्या विविध प्रलंबित समस्या मार्गी लागाव्यात, यासाठी आमदार प्रमोद जठार यांनी कोकण रेल्वेच्या मुख्य परिचालन व्यवस्थापकांची (COM) भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली.
या भेटीदरम्यान संबंधित चारही रेल्वे स्थानकांवर एक्सप्रेस गाड्यांचे थांबे उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच स्थानकांवरील प्रवाशांना आवश्यक असलेल्या सुविधा आणि स्थानकांशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.
कोकणातील प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा लक्षात घेता या मागण्यांवर रेल्वे प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी भूमिका आमदार प्रमोद जठार यांनी मांडली. प्रवाशांच्या सोयीसाठी या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.