कोटक महिंद्रा बँक, डॉईच बँकेचा भारतातील रिटेल आणि वेल्थ व्यवसाय विकत घेणार; ₹२८२ कोटींचा करार

0
19

मुंबई, दि. २ : कोटक महिंद्रा बँक लिमिटेड भारतातील डॉईच बँकेचा रिटेल बँकिंग, अफ्लुएंट प्रायव्हेट बँकिंग आणि वेल्थ मॅनेजमेंट व्यवसाय सुमारे ₹२८२ कोटींना विकत घेणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
या व्यवहारात सुमारे ₹२९,००० कोटींचे कर्जपोर्टफोलिओ, ₹१६,००० कोटींच्या ठेवी आणि ₹१०,५०० कोटींची व्यवस्थापनाखालील मालमत्ता (Assets Under Management) यांचा समावेश आहे. या व्यवसायाद्वारे सुमारे १.५ लाख ग्राहकांना सेवा दिली जात असून, त्यामध्ये जवळपास १,००० कर्मचारी कार्यरत आहेत.
या अधिग्रहणासाठी भारतीय स्पर्धा आयोग (Competition Commission of India) तसेच अन्य नियामक संस्थांची मंजुरी आवश्यक असून, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबर २०२७ पर्यंत व्यवहार पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
या व्यवहाराचा भाग म्हणून भारतातील डॉईच बँकेचे सुमारे १,००० कर्मचारी कोटक महिंद्रा बँकेत सामील होण्याची शक्यता आहे. संक्रमणाच्या काळात आणि व्यवहार पूर्ण झाल्यानंतरही ग्राहकांना अखंड व दर्जेदार सेवा मिळावी यासाठी दोन्ही बँका आवश्यक उपाययोजना करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here