“कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!”

0
95
“कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!”
“कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!”

“कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!”

काँग्रेसकडून नागरिकांच्या सहभागातून विकासाचा जाहीरनामा

कोल्हापूर : आगामी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने शहराच्या सर्वांगीण विकासाची दिशा ठरवण्यासाठी नागरिककेंद्रित उपक्रमाची घोषणा केली आहे. यासाठी आदरणीय खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी ऋतुराज संजय पाटील उपस्थित होते.

कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा बंद खोलीत ठरवण्याऐवजी जनतेतूनच ठरावा या भूमिकेतून काँग्रेस पक्षाने “कोल्हापूर कस्सं? तुम्ही म्हणशीला तस्सं!” हा अभिनव उपक्रम सुरू करत असल्याची माहिती देण्यात आली. या उपक्रमांतर्गत शहराच्या विकासाबाबत नागरिकांच्या अपेक्षा, संकल्पना व सूचना थेट स्वीकारल्या जाणार असून, त्याच आधारे काँग्रेस पक्षाचा कोल्हापूर महानगरपालिकेसाठीचा जाहीरनामा तयार केला जाणार आहे.

यावेळी शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, आनंद माने, ॲड. तौफिक मुल्लाणी, दौलत देसाई, राहुल माने, भारतीताई पवार, सरलाताई पाटील, इंद्रजीत बोंद्रे, बाळासाहेब सरनाईक, दुर्वासबापू कदम, संजय मोहीते, प्रतापसिंह जाधव, अमर समर्थ, शिवानंद बनछोडे, मोहन सालपे, भरत रसाळे, बयाजी शेळके, अनुप पाटील आदी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंगळवार, २३ डिसेंबर २०२५ रोजी, कोल्हापूर काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेतून काँग्रेसने शहर विकासासाठी लोकसहभागाला प्राधान्य देणारी भूमिका स्पष्ट केली असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत नागरिकांच्या अपेक्षांवर आधारित विकासाचे धोरण मांडण्याचा निर्धार व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here