क्रीडा संकुलांच्या प्रलंबित प्रस्तावांना गती द्या; अखर्चित निधी गरजू संकुलांकडे वळवा – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

0
6

राज्य क्रीडा विकास समितीच्या बैठकीत विविध क्रीडा संकुलांच्या प्रस्तावांचा आढावा; पात्र प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता
मुंबई :
सह्याद्री राज्य अतिथीगृह, मुंबई येथे राज्य क्रीडा विकास समितीची बैठक उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत राज्यातील विविध विभागीय, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलांच्या प्रस्तावांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
क्रीडा संकुलांसाठी दीर्घकाळापासून पडून असलेला अखर्चित निधी संबंधित समित्यांकडून परत घेऊन तो निधीची नितांत आवश्यकता असलेल्या अन्य क्रीडा संकुलांना पुनर्वितरित करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिले. तसेच क्रीडा संकुलांकडे उपलब्ध असलेल्या शिल्लक निधीचा तातडीने विनियोग करून प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.
शासकीय अनुदानाच्या निर्धारित मर्यादेत बसणाऱ्या विविध तालुका, जिल्हा आणि विभागीय क्रीडा संकुलांच्या प्रस्तावांना बैठकीतच प्रशासकीय मान्यता देण्यात आली. तर शासकीय अनुदान मर्यादेपेक्षा अधिक खर्चाच्या क्रीडा संकुलांचे प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
राज्यातील खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देणे, क्रीडा संकुलांची प्रलंबित कामे मार्गी लावणे आणि राज्यातील क्रीडा क्षेत्राच्या विकासाला नवी गती देणे यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here