खंडोबाच्या उपासक मुरळी महिलांचा जागतिक महिलादिन साजरा

0
37
खंडोबाच्या उपासक मुरळी महिलांचा जागतिक महिलादिन साजरा
खंडोबाच्या उपासक मुरळी महिलांचा जागतिक महिलादिन साजरा

खंडोबाच्या उपासक मुरळी महिलांचा जागतिक महिलादिन साजरा

पुंनंर्वसन केंद्राची आवश्यकता!

सध्या केवळ जेजुरी तीर्थक्षेत्र पंचक्रोशीत तीनशेहून अधिक मुरळी महिला आहेत राज्यातील खंडोबा मंदिर परिसरातूनही त्या आढळून येतात वार्धक्यात मात्र अनाथ सारखे जीवन जगावे लागते अथवा गुलामी स्वीकारवी लागते नाहीतर लावरीश जिंदगी या मुरळी उपासक केंद्रातून जगण्याकरिता आवश्यक बाबी म्हणेज औषध उपचार माणुसकीचा आधार मिळू शकतो या दृष्टीकोनातून मुरली वाघ्या केंद्राची आवश्यकता आहे शासनाने मागण्या नं केल्यास प्राण जायी पर्यंत खंडोबाच्या महाद्वार पायरी मार्गांवर उपोषण करावे लागेल असा इशाराही प्रिया शिंदे, आणि जावळकर यांनी दिला आहे.

पुरंदर l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यातील लोकप्रिय कुलदैवत खंडोबा देवता उपासक असलेल्या मुरळी नृत्यानगना एकत्र येऊन वाघ्या मुरळी इतिहासातील पहिला जागतिक दिन साजरा करण्यात आला.

घाटी कोटमा सांस्कृतिक मुरळी ची पाद्य पूजा.
घाटी कोटमा सांस्कृतिक मुरळी ची पाद्य पूजा.

या घाटी कोटमा सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमातून जागरण गोंधळ नृत्य करीत आपली देवता खंडोबा देवाला पगडी आणि घोघडी अर्पित करण्यात आली. खरं तर मुरली स्त्री खंडोबा देवताच्या धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातील पूजनीय मानली जात होती. बदलत्या काळा नुसार पारंपरिक जागरण गोंधळ चे ही स्वरूप बदलत गेल्याने मुरली ही मनोरंजन चे माध्यम म्हणून लोक बघू लागले आहेत. पारंपरिक वाद्य ही दृष्टीहन होऊ लागली आहेत. तरुण मुरळीची कार्यक्रमात मागणी वाढली आहे.

यामुळे देवाला आपले सर्वस्व अर्पित करणाऱ्या वयस्क मुरळी महिलांचे जिने जिकरीचे झाले. म्हणूनच प्रिया शिंदे आणि लोकवाघ्या विशाल जावंळकर यांनी मुरळींचा वारसा जपला जावा म्हणून जागतिक महिला दिन आणि घाटी कोटमा उत्सव साजरा केला.

सर्व महिला एकत्र आल्या आणि त्यांनी भंडारा कोटमा पूजन करीत महिला दिनाची सुरवात केली. यात जेष्ठ महिला मूरळीचें पाद्य पूजा करून त्यांना भेट देण्यात आली. या वेळी पारंपरिक गाणी असा जागरण गोंधळ जागरण घालण्यात आले. यात स्त्री शकरीचा सन्मान धार्मिक आणि सांस्कृतिक क्षेत्राची सांगड जुळवण्यात आली.

वार्धक्याच्या काळात मुरली आणि वाघ्याकडे कुणी बघत नसतं.जो पर्यंत जवानी आहे तो पर्यंत ताफायात काम मिळते व उपजीविका चालते ही आमची खन्त असून शासनाने आमच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करीत शासनाने देवसंस्थांनाच्या माध्यमातून प्रत्येक खंडोबा देवस्थान ठिकाणी मुरळी वाघ्या पुनंरवसन केंद्राची उभारणी करावी आणि सर्व वाघ्या मुरलींना कागदपत्र जातीच्या अटी शीतल करीत मानधन द्यावे अशी मागणी प्रिया शिंदे अहिल्या भुजबळ, रेखा शिंदे मीरा तायडाबाई शिंदे सोनवणे यांनी केली आहे यावेळी गौरी जाधव, पूजा बडगे, लता कुढाळकर, शारदा जाधव तसेच आयोजक विशाल जावळकर, संजय चव्हाण, संग्राम माळवे, निखिल बडगे, प्रशांत कदम इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते. मुरळी स्त्री च्या समस्या सुटतील का शासन त्यांच्या मागण्या सोडवू शकेलाका याकडे आता सर्वांचे लक्ष वेधले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here