गढीताम्हाणे राटेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
देवगड तालुक्यातील गढी-ताम्हाणे-राटेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त १५ व १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तांसाठी हरिपाठ, श्री समर्थ नृत्य, दिंडी भजन तसेच मानाच्या देवांचे आगमन असे विविध कार्यक्रम होणार असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
१५ फेब्रुवारी रोजी सकाळपासून धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात होणार असून दुपारी दिंडी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. १६ फेब्रुवारी रोजी रात्री ९ वाजता २०x२० दणदणीत भजनाचा जंगी सामना रंगणार असून नामवंत भजन मंडळांचा सहभाग राहणार आहे.
या सोहळ्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण गडीताम्हाणे-राटेश्वर, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे आहे.


