गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव, इंदापूर येथे ‘नो पार्किंग झोन’
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माणगाव, इंदापूर येथे ‘नो पार्किंग झोन’
महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी निर्णय
माणगाव :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच संभाव्य अपघात व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी माणगाव व इंदापूर येथील महामार्गालगतच्या काही भागात दोन्ही बाजूंनी ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आला आहे.
गणेशोत्सव काळात महामार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे महामार्गालगत अनधिकृतपणे वाहने उभी केल्यास वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन अपघाताचा धोका वाढू शकतो. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
वाहनचालकांनी संबंधित ‘नो पार्किंग झोन’मध्ये वाहने उभी करू नयेत आणि वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.