गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी राज्य सरकारकडून ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत टोलमाफी देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या विविध भागांतून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुलभ व्हावा आणि पथकराचा आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी या कालावधीत पथकर (टोल) माफ करण्यात आला आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना या टोलमाफीचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या कोकणवारीला यंदा टोलमाफीची जोड मिळाली आहे.