गणेशोत्सवासाठी रायगड पोलिसांचे वाहतूक नियोजन; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन

0
25

पोलीस अधीक्षक आचल दलाल यांचे नागरिकांना आवाहन; ‘शिस्तबद्ध वाहतूक-सुरक्षित गणेशोत्सव’चा संदेश

रायगड :
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यात वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहावी यासाठी रायगड पोलीस दलातर्फे विशेष वाहतूक नियोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाचा आनंद सुरक्षित आणि सुरळीतपणे साजरा करण्यासाठी नागरिकांनी पोलिसांनी वेळोवेळी दिलेल्या वाहतूकविषयक सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी केले आहे.
गणेशोत्सव काळात विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची व वाहनांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही मार्गांवर वाहतूक कोंडी झाल्यास नागरिकांनी पोलिसांनी सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये तसेच गर्दीच्या ठिकाणी संयम बाळगावा, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यास हातभार लावावा, असे आवाहन रायगड पोलीस दलाने केले आहे.
‘शिस्तबद्ध वाहतूक – सुरक्षित गणेशोत्सव’ या संदेशातून रायगड पोलिसांनी नागरिकांना गणेशोत्सवाचा आनंद सुरक्षित वातावरणात घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here