गायिका केतकी माटेगावकरच्या चुलत भावाने अक्षय माटेगावकरने पुण्यामध्ये आत्महत्या केली.अक्षय माटेगावकर सुसगाव येथील माउंट युनिक सोसायटीच्या आठव्या मजल्यावर मित्रांसोबत राहत होता. तो सिम्बॉयसिस महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत होता. अक्षय नोकरीच्या बाबतीत खूपच टेन्शनमध्ये होता. यासाठी अक्षय खूप मेहनत देखील करत होता. नुकतीच त्याने एका आयटी कंपनीत इंटर्नशिप पूर्ण केली होती. त्यानंतर काही कंपन्यांमध्ये नोकरीसाठी त्याने अर्ज ही केले होते. मात्र नोकरी मिळविण्यात त्याला यश येत नव्हते. पण नोकरी भेटणार नाही या भीतीने त्याच्या मनात भीती होती. या चिंतेतून त्याने टोकाचे पाऊल उचलत राहत असलेल्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी अक्षय माटेगावकरने सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्याने या सुसाईट नोटमध्ये असे लिहिले आहे की, ‘माझ्या आयुष्यातील प्रत्येकाची मी माफी मागतो. ही शेवटची गोष्ट असेल मी लिहतोय. माझ्याकडून तुमच्या अपेक्षा पूर्ण न झाल्यामुळे, मी तुमची माफी मागतो. मी खूप प्रयत्न केले, पण मला ते जमले नाही. मी इंटर्नशिपमध्ये चांगली कामगिरी करण्याचा खूप प्रयत्न केला , पण तिथेही मी खराब झालो. हे पाहिल्यावर मला माहित आहे की मी नोकरी मिळवू शकत नाही आणि हे तुम्हाला सांगण्याचे धाडस माझ्यात नाही. शिवाय माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नाही. आई – बाबा आणि आकांक्षा, मला माफ करा. मी निघालो. तुमचा, अक्षय माटेगावकर.’ अक्षयच्या आत्महत्येमुळे माटेगावकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.