गिरणी कामगारांना घरांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी ३१ डिसेंबर पर्यंत मुदत
कणकवली l
सन १९८२ च्या गिरणी कामगार संपामध्ये उध्वस्त झालेल्या आणि कागदपत्रांअभावी घरासाठी अर्ज दाखल करु न शकलेल्या गिरणी कामगारांना म्हाडाने आणखी एक संधी दिली आहे. येत्या ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती गिरणी कामगार कर्मचारी निवारा आणि कल्याणकारी संघाचे सरचिटणीस हेमंत राऊळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
संबंधित गिरणी कामगारांना त्यांच्या गिरणीतून कागदपत्रे मिळवून देण्यासाठी आपण मार्गदर्शन करणार आहोत. तरी संबंधितांनी आपणास ९८६९० ०८१२६ वर संपर्क साधावा, असे या पत्रकात नमूद केले आहे.


