गीत रामायणाने आजी-आजोबांना मिळाले नवचैतन्य

0
120
गीत रामायणाने आजी-आजोबांना मिळाले नवचैतन्य
गीत रामायणाने आजी-आजोबांना मिळाले नवचैतन्य
गीत रामायणाने आजी-आजोबांना मिळाले नवचैतन्य
दिविजा वृध्दाश्रम व दिक्षित फाउंडेशन यांचे संयुक्त आयोजन

सिंधुदुर्ग विवेक परब
दिविजा वृद्धाश्रम व दीक्षित फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात गीत रामायण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना गीत रामायणाचा आस्वाद घेता यावा या उद्देशाने आश्रमाचे सचिव संदेश शेट्ये यांनी दीक्षित फाउंडेशनच्या मदतीने गीत रामायण कार्यक्रम दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांच्या मनोरंजनासाठी ठेवला. दीक्षित फाउंडेशन ग्रामीण भागातील गरजवंत लोकांसाठी काम करणारी कोकणातील एक संस्था आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम ही संस्था राबवत आहे. मराठी गाण्याच्या कार्यक्रमाला प्रोत्साहन मिळावे. स्वतःच्या आई वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मराठी गाण्याचे कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करतात. निरंजन दीक्षित हे स्वतः दीक्षित फाउंडेशन या नावाने देवगड येथे संस्था चालवीत आहेत. या संस्थेचे कोकणात विविध उपक्रम राबवत आहेत.

दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबांना सतत आनंदी ठेवण्यासाठी दिविजा वृद्धाश्रम कायम प्रयत्नशील असते. आजी आजोबांसाठी दत्त जयंतीचे औचित्य साधून आश्रमातील कर्मचारी श्रीम भारती गुरव यांच्या सुस्वर आवाजात सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या संयोगाने भजनाचा आनंद घेतला तर गीतरामायणाचा कार्यक्रम करून आजी आजोबांच्या उत्साहात अजून भर घातली. घरापासून लांब झालेल्या आजी आजोबांन या कार्यक्रमामुळे नवचैतन्य वाटू लागले. आपण कुटुंबापासून लांब झालो असलो तरी आपल्या नवीन भावंडांसह एक नवीन सहजीवन जगात आहोत याचा अभिमान सर्व आजी आजोबांना वाटत आहे. घरात असताना आम्ही आनंदी होतो परंतु आश्रमात आल्यावर आम्ही सुखी समाधानी झालो आहोत असे आजी आजोबांचे म्हणणे आहे.वयोमानामुळे व शारीरिक व्याधीमुळे आम्ही खचत चाललो होतो व घराच्या एका कोपऱ्यात आमची जागा होत चालली होती परंतु दिविजा वृद्धाश्रमाच्या मदतीने आम्ही जीवनाची सेकंड इनिंग अगदी उत्साहाने व आनंदाने खेळत आहोत. जगण्याची संपलेली आशा पुन्हा आता नवजीवन देण्याची उमेद दिविजा वृद्धाश्रमाने आम्हाला दिली आहे. गीत रामायण कार्यक्रमासाठी गायक श्री विनोदजी गोखले तबला वादक संदीप फडके, गौरव पाटणकर, तालवाद्य उदय मेस्त्री, तुषार सुतार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अंतिम संस्थेचे सचिव  संदेश शेट्ये यांनी शाल श्रीफळ देऊन आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला. तसेच या कार्यक्रमाला आश्रमातील सर्व आजी आजोबा, सर्व कर्मचारी वर्ग, प्रकाश पावसकर, संजय गोरुले, कोळोशी व असलदे गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here