गुरु तेग बहादूर साहिबजी शहीदी वर्षानिमित्त पनवेलमध्ये दंत उपचार शिबिर

0
39

मुंबई l प्रतिनिधी

“हिंद-दी चादर” म्हणून ओळखले जाणारे गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पनवेल येथील आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहात दंत रोग उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात डॉ. अपूर्वा यांच्यासह चार महिला वैद्यकीय अधिकारी उपस्थित होत्या. विद्यार्थिनींची तपासणी करून आवश्यक उपचार व मार्गदर्शन करण्यात आले. दातांची स्वच्छता, तोंडाच्या आरोग्याची काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाय याबाबतही माहिती देण्यात आली.

शिबिराला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अशा उपक्रमांमुळे दुर्गम भागातील विद्यार्थिनींना आरोग्य सुविधा उपलब्ध होत असून त्यांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here