गुहागरच्या वेळंब येथे बिबट्याच्या मादी पिल्लाची सुरक्षित सुटका; वनविभागाचे तत्पर बचावकार्य

0
8

शृंगार तळी-अबलोली मार्गावर आढळले चार ते पाच महिन्यांचे पिल्लू; पशुवैद्यकीय तपासणीत प्रकृती सुस्थितीत असल्याचे स्पष्ट

गुहागर :
गुहागर तालुक्यातील मौजे वेळंब (नालेवाडी) येथे रस्त्याच्या कडेला आढळलेल्या बिबट्याच्या मादी पिल्लाची वनविभागाच्या पथकाने सुरक्षित सुटका केली. शृंगार तळी ते अबलोली मार्गावर हे पिल्लू आढळून आले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सतर्कता दाखवत कोणतीही हानी होऊ न देता पिल्लाला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
सकाळच्या सुमारास वेळंब (नालेवाडी) परिसरातील शृंगार तळी ते अबलोली रस्त्याच्या बाजूला बिबट्याचे पिल्लू आढळल्याची माहिती बाळकृष्ण ओक यांनी वनविभागाला दिली. माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. आवश्यक खबरदारी घेत पिल्लाला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले.
त्यानंतर पशुधन विकास अधिकारी डॉ. जाणवले यांनी पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली. हे पिल्लू मादी जातीचे असून त्याचे वय अंदाजे चार ते पाच महिने असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. पिल्लाची प्रकृती सुस्थितीत असल्याची खात्रीही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली.
हे बचावकार्य विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड आणि चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. या मोहिमेत गुहागरचे वनपाल अमित निमकर, रानवीचे वनरक्षक श्री. गायकवाड, अडूरचे वनरक्षक श्री. मांडवकर आणि आबलोलीचे वनरक्षक श्री. पवार यांनी सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here