गुहागर तहसील कार्यालयाला विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट

0
31
गुहागर तहसील कार्यालयाला विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट
गुहागर तहसील कार्यालयाला विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट

गुहागर तहसील कार्यालयाला विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट

गुहागर l 

कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुहागर तहसील कार्यालयास भेट देत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा १ च्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी तहसील कार्यालयातील विविध विभागांचे कामकाज पाहून अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

या भेटीदरम्यान विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांनी ग्राम महसूल अधिकारी तसेच मंडळ अधिकारी कार्यालयासही भेट दिली. शिबिराच्या पूर्वतयारीची सद्यस्थिती, नागरिकांना मिळणाऱ्या महसूल सेवांचा वेग, तसेच प्रलंबित प्रकरणांची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. नागरिकांना महसूल विषयक सेवा वेळेत आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने अधिक प्रभावीपणे काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

तसेच ई-फेरफार, पीक पाहणी आदी महसूल विषयांबाबत सुरू असलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. या कामांमध्ये पारदर्शकता राखत शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचेही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले. विभागीय आयुक्तांच्या या भेटीमुळे महसूल विभागाच्या कामकाजात अधिक गती येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

यावेळी तहसीलदार तसेच महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. विभागीय आयुक्तांच्या या दौऱ्यामुळे विभागीय काम -काजात अधिक कार्यक्षमता आणि समन्वय वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here