गोपुरी आश्रमात उद्या रंगणार ‘कविता अड्डा’; सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना संधी
गोपुरी आश्रमात उद्या रंगणार ‘कविता अड्डा’; सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना संधी
कणकवली :
गोपुरी आश्रमाच्या जीवन शिक्षण शाळा उपक्रमांतर्गत रविवार, २९ नोव्हेंबर रोजी ‘कविता अड्डा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.३० ते दुपारी १२ या वेळेत आश्रमाच्या चिकूच्या बागेत हा साहित्यिक उपक्रम रंगणार आहे.
या कार्यक्रमात साहित्य अभ्यासक प्रसाद घाणेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कविता, साहित्य आणि अभिव्यक्ती यांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच त्यांच्यातील साहित्यिक आवड जोपासली जावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात इयत्ता सहावी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, नावनोंदणीसाठी संदीप सावंत किंवा अर्पिता मुंबरकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन गोपुरी आश्रमातर्फे करण्यात आले आहे.