गोवा: आयुर्वेद संस्थेला पर्यावरणाचे उल्लंघन केल्याबद्दल 23 लाख रुपयांचा दंड ठोठावला!

0
120

गोव्यातील ऑल इंडिया इंन्स्टीट्यूट ऑफ आयुर्वेद (AIIA) या संस्थेला बांधकाम करताना पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 23 लाख रुपयांचा दंड गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरणाने (Goa-SEIAA) ठोठावला आहे.या संस्थेला केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून निधी दिला जातो.

धारगलीम येथील या प्रकल्पाचे भूमिपूजन २०१८ मध्ये आयुष्य मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते झाले होते. परंतु प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी (ईसी) या वर्षी ऑगस्ट मध्ये दिली होती. पण जेव्हा गोवा राज्य पर्यावरण प्रभाव मूल्यांकन प्राधिकरण समिती या प्रकल्पाची मंजुरीपूर्व तपासणी करण्यास १७ ऑगस्टला गेले असता प्रकल्पाच्या इमारतीचे काम आधीच सुरु करण्यात आल्याचे निदर्शनास आले.एसओपी नुसार, एकूण प्रकल्पाच्या खर्चाच्या 1% दंड आकारला जातो. या प्रकल्पाची एकूण किंमत २३ करोड रुपये असल्याने दंडाची रक्कम २३ लाख झाली आहे. प्राधिकरणाने त्यांना संदर्भ अटी (टीओआर) देण्याचा ई मंत्रालयाने जारी केलेल्या कार्यालयाच्या निवेदनानुसार दंड करण्याचा निर्णय घेतला.

एआयआयएसाठी निर्धारित 2 लाख चौरस मीटरच्या एकूण भूभागापैकी, ४७,५०० Sq.मीटर जागेत बांधकाम करण्यात आले आहे. या इमारतीत १०० बेडच्या हॉस्पिटलची व्यवस्था असून ग्रॅज्युएट आणि पोस्टग्रॅज्युएट शिक्षणाची सोय होणार आहे. एकूण ५०० विद्यार्थी या प्रकल्पात प्रशिक्षण घेऊ शकणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here