गोवा क्षेत्रीय कार्यालय , पणजी द्वारा 9 डिसेंबर रोजी क्षेत्रीय स्तरावरील 64 वी डाक अदालत

0
4

गोवा क्षेत्रीय कार्यालय , पणजी द्वारा 9 डिसेंबर रोजी क्षेत्रीय स्तरावरील 64 वी डाक अदालत

पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी द्वारा 9 डिसेंबर रोजी क्षेत्रीय स्तरावरील 64 वी डाक अदालत सकाळी 11 वाजता पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्र, पणजी यांच्या कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

हे पण वाचा रत्नागिरीत समाजकल्याण विभागामार्फत क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव

संबंधितांनी डाक सेवेबाबतची तक्रार सहायक डाक निदेशक 1, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी ४०३००१ यांच्या नावे अतिरिक्त प्रतीसह 1 डिसेंबर 2025 पर्यंत अथवा तत्पूर्वी पोहोचेल अशा रीतीने पाठवावी, त्यानंतर आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाणार नाही, असे डाकघर अधीक्षक, रत्नागिरी यांनी कळविले आहे.

पोस्टाच्या कार्यपद्धतीविषयी किवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निराकरण सहा आठवडयांच्या आत झालेले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतमध्ये दखल घेतली जाईल.

विशेषतः टपाल वस्तू / मनीऑर्डर / बचत बँक खाते / प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.

तक्रारींचा उल्लेख तारीख व ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा या सर्व तपशीलासह केलेला असावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here