रत्नागिरीत समाजकल्याण विभागामार्फत क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव

0
72
रत्नागिरीत समाजकल्याण विभागामार्फत क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव
रत्नागिरीत समाजकल्याण विभागामार्फत क्रीडा-सांस्कृतिक महोत्सव

रत्नागिरी | समाजकल्याण विभागामार्फत शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी आणि कर्मचारी यांच्यासाठी 28 ते 30 नोव्हेंबर 2025 या कालावधीत जिल्हास्तरीय क्रीडा व कला-सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, रायपाटण (पाचल), राजापूर येथे होणार आहे.

कार्यक्रमातील सांस्कृतिक महोत्सव 28 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 ते 10 दरम्यान पार पडेल. उद्घाटन समाजकल्याण मुंबई विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा कोषागार अधिकारी प्रविंद बिरादार यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी सहायक आयुक्त समाजकल्याण दीपक घाटे असतील.

क्रीडा महोत्सव 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरू होईल. उद्घाटन बाळासाहेब सोळंकी यांच्या उपस्थितीत जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्ष म्हणून दीपक घाटे तर प्रमुख अतिथी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे असतील.

पारितोषिक वितरण समारंभ 30 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सह आयुक्त (शिक्षण) समाजकल्याण आयुक्तालय प्रमोद जाधव यांच्या हस्ते होणार आहे. बाळासाहेब सोळंकी व प्रशांत सातपुते प्रमुख उपस्थित राहतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here