घावनळे येथे २३ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर

0
16
घावनळे येथे २३ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर
घावनळे येथे २३ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर

घावनळे येथे २३ जुलै रोजी भव्य रक्तदान शिबिर

मोफत आरोग्य तपासणी शिबिराचाही लाभ

 वैभववाडी प्रतिनिधी
श्री स्वामी समर्थ मठ, घावनळे (कासमळा) येथे गुरुवार, २३ जुलै २०२६ रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज लक्षात घेऊन हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगदंबा परिवार, घावनळे यांच्या वतीने आयोजित या शिबिराला सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांचे सहकार्य लाभले आहे. रक्तदान शिबिराची सुरुवात सकाळी ९ वाजल्यापासून होणार आहे.
यासोबतच नागरिकांसाठी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. एसएसपीएम हॉस्पिटल, पडवे यांच्या सहकार्याने तसेच श्री मातोश्री सेवाधाम आरोग्य ट्रस्ट, मुंबई यांच्या माध्यमातून विविध आरोग्य तपासण्या करण्यात येणार आहेत. यामध्ये नेत्र तपासणी तसेच फक्त ₹१८० मध्ये उत्कृष्ट दर्जाचे चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. आरोग्य शिबिराची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत असेल.
रक्तदानासाठी नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी श्री. अमित चव्हाण (मो. ९१३०७६४१६४) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष मा. श्री. दादा गवस यांनी रक्तदानासारख्या या जीवनदायी उपक्रमात नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here