‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान मुंबईत

0
43
‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव
‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव

‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव १२ ते १५ नोव्हेंबरदरम्यान मुंबईत

मुंबई : राज्य शासनाचा अधिकृत ‘चित्रपताका’ चित्रपट महोत्सव यंदा १२ ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली.

या महोत्सवाच्या तयारीसंदर्भात पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे आयोजित बैठकीस विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील उपस्थित होते. महोत्सवाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीला चालना देण्याबरोबरच नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

‘चित्रपताका’ महोत्सवामुळे चित्रपटप्रेमींना विविध दर्जेदार चित्रपट पाहण्याची संधी मिळणार असून, सांस्कृतिक क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here