चिपळूण–दिवा–चिपळूण मेमू अनारक्षित विशेष गाडी २८ जून रोजी धावणार

0
28
चिपळूण–दिवा–चिपळूण मेमू अनारक्षित विशेष गाडी २८ जून रोजी धावणार
चिपळूण–दिवा–चिपळूण मेमू अनारक्षित विशेष गाडी २८ जून रोजी धावणार

चिपळूण–दिवा–चिपळूण मेमू अनारक्षित विशेष गाडी २८ जून रोजी धावणार

चिपळूण
 आठवड्याच्या शेवटी होणारी अतिरिक्त प्रवासी गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने रविवार, २८ जून २०२६ रोजी चिपळूण–दिवा–चिपळूण मेमू अनारक्षित विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११६० / ०११५९ ही विशेष मेमू अनारक्षित सेवा प्रवाशांच्या सोयीसाठी चालविण्यात येणार असून कोकण विभागातील प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे.
सुट्टीच्या दिवशी वाढणारी गर्दी कमी करणे, प्रवाशांना अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देणे आणि नियमित गाड्यांवरील ताण कमी करणे हा या विशेष सेवेचा उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here